कवठे महांकाळ तालुक्याचे आराध्य दैवत श्री महांकाली देवीच्या नांवाने श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लि, राजारामबापूनगर, कवठे महांकाळ जि. सांगली. हा कारखाना ओळखला जातो. या कारखान्याची स्थापना सन १९८२ साली झाली असून प्रत्यक्षात सन १९८५ साली गळीतास प्रारंभ झाला. स्व. राजारामबापू पाटील, लोकनेते स्व. नानासाहेब सगरे, स्व. पंडीतराव जाधव यांनी या कारखान्याची स्थापना केली. दुष्काळी भागातील हा कारखाना नेहमीच दुस-या तालुक्यातील ऊसावर अवलंबून आहे.
चांगल्या प्रतीची साखर निर्माण करणे, ऊसाला योग्य भाव देणे, सर्व सभासदांचे जीवनमान उंचावणे यासारखे अनेक उद्योग या कारखान्यामार्फत घेतले जातात. हा साखर उद्योग सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यास सक्षम करणेसाठी हे पोर्टल त्यांना डिजीटल कॅटलॉगव्दारे उत्पादने आणि सेवांच्याबाबतीत त्यांच्या ऑफरचे प्रदर्शन करू देते.